नोव्हेंबर महिन्यात १३ सापांचे रेस्क्यू केले.
नोव्हेंबर महिन्यात १३ सापांचे रेस्क्यू केले. १३ पैकी ११ साप बिनविषारी तर २ साप विषारी होते. नोव्हेंबर महिन्यात एकाही रेस्क्यूचा व्हिडिओ पोष्ट केला नाही.
नोव्हेंबर महिना बऱ्यापैकी दुर्मिळ आणि सहसा हाती न लागणाऱ्या सापांचा राहिला. महिन्याची सुरुवातच धूळ नागीण सापाने झाली. हा साप मी साधारण ९ वर्षानंतर पाहिला. शरीर दिसायला नागाप्रमाणे पण तोंड नागासारखे नाही असा हा बिनविषारी आणि धामण पेक्षा जास्त स्पीड असलेला रेसर स्नेक म्हणजेच धूळनागीण..
नानेटी ( Buff striped killback Snake) या सापाची देखील भेट झाली. दिसायला अतिशय सुंदर असा हा माझा आवडीचा साप. सोबतच भला मोठा विरुळा, दिवड (Checkered killback Snake) या गरिबांचा किंग कोब्रा असलेल्या आणि बाईट मास्टर असलेल्या बिनविषारी चावक्या सापाची पण या महिन्यात भेट झाली.
सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील ४ मुख्य विषारी सापांपैकी एक असलेल्या 'फुरसे' (Saw scaled viper) सापाची या महिन्यात अतिशय सुंदर भेट झाली. पूर्ण सोनेरी डोळे आणि त्यात एक उभी काळी लाईन, शरीरावर एक एक शिंपले ठेवल्याप्रमाणे डिझाइन असे अतिशय सुंदर रूप असलेल्या या अतिविषारी आणि आक्रमक सापाची भेट अविस्मरणीय राहीली.
अलिशा देखील रेक्यु ऑपरेशन मध्ये आता न घाबरता सामील होते. बिनविषारी साप ती चांगल्या पद्धतीने हँडल करायला शिकली आहे.
सापांचे विश्व खूप मोठे आहे. माणूस म्हणून निदान मी तरी त्यासमोर खूपच छोटा आहे. नवनवीन माहिती दरवेळी मिळत असते. जगभरात बरेच जण यावर संशोधन करत असतात. हे संशोधन करताना मागील माहिती कशी अपूर्ण आहे किंवा चुकीची आहे हे सप्रमाण सिद्ध करून पुढची वाट धरली जाते. याच कोणाला काहीही वाईट वाटत नाही. उलट नवीन माहिती मिळाली याचा आनंद होतो. ज्याचा फायदा संपूर्ण मानव जातीला होतो.
माझ्यासाठी विज्ञानातील ही गोष्ट कायम आवडीची राहिली आहे. विज्ञान स्वतःला परिपूर्ण समजत नाही. तो संशोधन करत राहतो. जुने संशोधन नाकारतो, नव्याची कास धरतो. पण जुने संशोधन पुढील पिढीला अभ्यासण्यासाठी जपून देखील ठेवतो. प्रत्येकाला त्यावर संशोधन करायला देतो आपले सिद्धांत मांडण्याची संधी देतो. प्रत्येक नवीन संशोधन कालांतराने जुने होणार आहे हे माहीत असून देखील हे सुरूच असते. माझेच संशोधन अंतिम. आता इथून पुढे कोणीही संशोधन करायचे नाही असे कोणीही म्हणत नाही. सप्रमाण आप आपले संशोधन दाखवायला सर्वांना संधी असते हे महत्वाचे.
असो, विज्ञानातील या गोष्टी धर्माने स्वीकारल्या तर खूप बरे होईल. जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते. असा चुत्या विचार आपल्याला सांगितला जातो. खरे पाहता विज्ञान कधीच संपत नाही आणि संपणार देखील नाही. #समजलंतरठीक
- पैगंबर शेख
(वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला Snake lover 🐍)
कृपया लिंक वर क्लीक करून इतर फोटो पहावे 👇🏽
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0jLxmKtjYuKmVPgvvpMRqp2vATkzanMitiLeE8iN4N2Ea4CFMnDA8YKWoSdQpymB5l&id=100000718951444&sfnsn=wiwspmo&mibextid=RUbZ1f